Ad will apear here
Next
अबब! सुंदर पिचाईंना तब्बल १४ कोटींची पगारवाढ
गुगल आणि अल्फाबेट या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी भारतीय-अमेरिकन वंशाचे सुंदर पिचाई यांना कंपनीने तब्बल दोन दशलक्ष डॉलर्स म्हणजेच १४ कोटी रुपये इतकी पगारवाढ दिली आहे. यामुळे सुंदर पिचाई यांनी वार्षिक पगाराच्याबाबतीत एक नवं शिखर गाठले आहे....
.....
गुगलचीच मूळ कंपनी असलेल्या अल्फाबेटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाची जबाबदारी सुंदर पिचाई यांच्याकडे असून, त्यांची टेक होम सॅलरी यंदा दोन दशलक्ष डॉलर्सने वाढणार आहे. त्याशिवाय त्यांना १२० दशलक्ष डॉलर्सचे शेअर्ससुद्धा देण्यात येणार आहेत.  ते जगातील सर्वात शक्तिशाली कॉर्पोरेट व्यक्तिमत्त्व बनले आहेत. 

अल्फाबेटने युनायटेड स्टेटस सिक्युरिटी अँड एक्स्चेंज कमिशनला दिलेल्या माहितीनुसार, पिचाई यांना १२० दशलक्ष डॉलर्सचे शेअर्ससुद्धा दिले जातील. गुगलच्या अहवालानुसार, सुंदर पिचाई यांचे वार्षिक वेतन सहा लाख ५० हजार डॉलर्स आहे. यात झपाट्याने वाढ होत आहे, तसेच पिचाई यांना प्रोत्साहन भत्त्यापोटी ४५ दशलक्ष डॉलर्स मिळणार आहेत. २०१४ पासून पिचाई यांना स्टॉक ऑप्शनमधून ५५० दशलक्ष डॉलर्स मिळाले आहेत. पिचाई यांना २०१५  साली सहा लाख ५२ हजार ५०० अमेरिकन डॉलर्सएवढा पगार मिळाला होता. पिचाई यांना २०१६ या वर्षात पगार व अन्य भत्त्यांच्या स्वरूपात तब्बल १२.८५ अब्ज रुपये मिळाले आहेत. आधीच्या वर्षाच्या तुलनेत ही रक्कम दुप्पट असून, सरासरी काढल्यास महिन्याला त्यांना १०० कोटी मिळाले आहेत.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZGYCH
Similar Posts
डॉ. सायरस पूनावाला यांना बिल गेट्स यांच्या हस्ते ‘आयसीएमआर’ पुरस्कार प्रदान पुणे : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना नुकताच प्रतिष्ठित ‘आयसीएमआर जीवनगौरव पुरस्कार’ बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे सह-अध्यक्ष बिल गेट्स यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
फ्लॅट खरेदी आणि नवे निकष रेरा कायद्यामुळे फ्लॅट घेताना गुंतवणूकदारांना बऱ्याच गोष्टींची शाश्वती लाभत असली तरी रेराची मान्यता ही बांधकाम सुरू करण्यासाठी असते. शक्यतो तयार फ्लॅट घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. आजच्या काळात फ्लॅट घेताना काही बाबतीत दक्षता घेणे गरजेचे आहे. त्या विषयी....
‘किर्लोस्कर’ला सर्वोत्कृष्ट व्यवसाय पुरस्कार पुणे : किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेड कंपनीला यंदाचा ‘सीआयआय एक्झिम बँक सर्वोत्कृष्ट व्यवसाय’ पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार पटकावणारी डीझेल इंजिन, जनरेटर्स क्षेत्रातील ही पहिली कंपनी आहे. बेंगळुरू इथं नुकत्याच झालेल्या २७ व्या राष्ट्रीय गुणवत्ता परिषदेत ‘केओइएल’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर
Maruti Suzuki Dzire becomes India’s No. 1 selling car Mumbai : Leading the compact sedan segment for over a decade, Maruti Suzuki Dzire has become the best-selling car in the first 8-months of 2019-20 with more than 1.2 lakh unit sales between Apr-Nov 2019. With the best-in-class fuel efficiency and enhanced safety features, Dzire crossed the record milestone of 2 million unit sales recently

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language